शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
2
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
3
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
4
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
5
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
6
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
7
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
8
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
10
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
11
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
12
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
13
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
14
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
15
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
16
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
17
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
18
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
19
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
20
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं

होय... मी टायगर मेमनला भेटलो होतो - काँग्रेस आमदार

By admin | Published: July 31, 2015 5:03 PM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये टायगर मेमनची अनेकदा भेट झाली होती अशी खळबळजनक कबुली जम्मू काश्मीरमधील काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. ३१ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये टायगर मेमनची अनेकदा भेट झाली होती अशी खळबळजनक कबुली जम्मू काश्मीरमधील काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी दिली आहे. बदला घेण्यासाठीच टायगर मेमनने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले असा दावाही माजिद यांनी केला आहे. 
जम्मू काश्मीर बंदीपोर येथून निवडून येणारे उस्मान माजिद हे स्वतः पूर्वी दहशतवादी होते. मात्र १९९५ मध्ये ते पुन्हा भारतात परतले व दहशतावाचा मार्ग सोडून जम्मू काश्मीरमधील राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला अपक्ष व आता  काँग्रेसच्या तिकीटावर ते जम्मू काश्मीर विधानसभेत निवडून जातात. याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर माजिद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी १९९३ ते ९४ या काळात टायगर मेमनची भेट झाल्याची कबुली दिली. टायगर हा हिलाल बेगचा जवळचा मित्रा होता व तो पाकव्याप काश्मीरमध्ये पाहुणा बनून यायचा. माझी ३ ते ४ वेळा टायगरशी भेट झाली होती असे उस्मान यांनी सांगितले. हिलाल बेग हा इखवान हे मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता व माजिद हे बेग याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचेय 

मुंबई बॉम्बस्फोटानंतर  टायगर मेमन कराचीत होता व त्याने अनेकदा आमच्या कार्यालयात भेटही दिली होती. नोव्हेंबर १९९३ मध्ये पहिल्यांदा उस्मान यांची टायगर मेमनसोबत भेट झाली होती.  या भेटीला उजाळा देत माजिद म्हणाले, मुंबईत बॉम्बस्फोट का घडवला असा सवाल मी टायगरला विचारला होता. यावर टायगर म्हणाला होता, १९९२ च्या दंगलींनंतर काही मुस्लिम महिला माझ्या घरी आल्या होत्या. त्यांनी मला बांगड्यांचा आहेर दिला होता. यानंतर मी बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवल्याची कबुली टायगरने दिली होती असे उस्मान माजिद यांनी सांगितले.