शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Yes Bank Updates: येस बँकेत तुमचं खातं आहे का?... मग ही माहिती वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 19:14 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिलेले असले तरीही या काळात केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.

नवी दिल्ली : आरबीआयने गुरुवारी रात्री य़ेस बँकेवर महिन्याभराचे निर्बंध लादले आणि आज सकाळी शेअर बाजाराने नांगी टाकली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिलेले असले तरीही या काळात केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. आज बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. या बँकेत खाते असल्यास काय होईल...जाणून घ्या. 

येस बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट असल्यास...आरबीआयने 50000 रुपयेच काढण्याचे लिमिट दिले आहे. जर पगार त्यापेक्षा जास्त असेल तर खातेधारकाला अडचण येणार आहे. यासाठी त्याने इतर पर्याय वापरावेत. 

जर एकापेक्षा जास्त खाती असतील तर? येस बँकेमध्ये एकापेक्षा जास्त खाती असतील तर त्याला या लिमिटचा मोठा फटका बसणार आहे. तो खातेदार एकत्रित 50 हजारच काढू शकणार आहे. 

बँक बुडाल्यास काय? केंद्र सरकारने नुकतीच बँक बुडाल्यास त्यातील 5 लाखांची हमी मिळणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार जर बँक बुडाली तर ग्राहकांना त्यांच्या एकूण रकमेपैकी 5 लाखांची रक्कम मिळेल. 

 

ईएमआय किंवा पैसे हस्तांतरण?तात्काळ पैसे हस्तांतरण, चेक क्लिअरन्स आणि ईएमआय यापैकी ज्याची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांचे पैसे आपोआप कापले जातील. मात्र, ज्यांचे ईएमआय 50 हजारांपेक्षा जास्त आहेत त्यांना समस्या येईल. 

कर्मचाऱ्यांचे काय? येस बँकेला 20000 कर्मचाऱ्यांचा पगार आणि शाखांच्या इमारतीचे भाडे आदी रक्कम देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत आताच सांगणे कठीण आहे. कारण जर बँक बंद झाली तर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असेल. 

SBI मध्ये विलिनीकरण झाले तर? सध्याच्या हालचालींनुसार ही चांगली बातमी आहे. जर एसबीआयने ही बँक ताब्यात घेतली तर येस बँकेचे ग्राहक सुरक्षित राहतील.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSBIएसबीआयReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक