शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची वर्षपूर्ती : गरज पडल्यास पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’,भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:43 IST

शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही

श्रीनगर : शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. अम्बू यांनी गुरुवारी पाकिस्तानचे थेट नाव न घेता दिला.पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी प्रशिक्षण तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उधमपूर येथील कमांड मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना जनरल अम्बू म्हणाले, प्रत्यक्ष सीमा रेषाही ओलांडली जाऊ शकते, असा स्पष्टच संदेश शेजारी देशाला देण्यासाठीच ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्या गेल्या होत्या व गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा सीमा ओलांडायला जराही मागे हटणार नाही. भारतीय लष्कर गरजेनुसार केव्हाही व कुठेही सीमापार आघात करायला पूर्णपणे सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल अम्बू यांनी दिली.गेल्या वर्षीच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे व रसद पुरवून प्रत्यक्ष कामगिरीवर रवाना करणारी ‘लॉन्च पॅड््स’ कमी होण्याऐवजी वाढली आहेत. आजही सीमेच्या पलीकडे पीर पांजाळ पर्वतराजीच्या दक्षिणेस व उत्तरेस अशी प्रशिक्षण केंद्रे व ‘लॉन्च पॅड््स’ मोठ्या संख्येने अस्तित्वात आहेत, अशी कबुली जनरल अम्बू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.असे असले तरी काश्मीर खोºयात सीमेच्या पलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे, असा दावा करून ते म्हणाले की, आजही दहशतवाद्यांचे सीमेवरून खोºयात घुसखोरी करण्याचे प्रयत्न वारंवार सुरू असतात. पण बव्हंशी प्रयत्न लष्कराकडून वेळीच हाणून पाडले जातात. (वृत्तसंस्था)काश्मीरप्रश्नी बंदुकीऐवजी चर्चा करावीइस्लामाबाद : पाकिस्तानला दूषणे देणे आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी झगडणाºया काश्मिरी जनतेवर बंदुका चालविण्याऐवजी काश्मीर समस्येवर राजकीय व राजनैतिक पातळीवर चर्चा करून तोडगा काढणे भारताच्या अधिक हिताचे आहे, असा शाहजोगपणाचा सल्ला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरPakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान