शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती ठाकूर दिल्लीत स्मृती इराणींना भेटल्या; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

By मोरेश्वर येरम | Updated: December 18, 2020 19:35 IST

काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची शुक्रवारी भेट घेतली.

ठळक मुद्देराज्याच्या प्रश्नांबाबत यशोमती ठाकूर यांनी घेतली स्मृती इराणींंची भेटपूरक पोषक कार्यक्रमासाठी २००३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरीचं निवेदनस्मृती इराणींची भेट घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्लीकाँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची शुक्रवारी भेट घेतली. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.  यशोमती ठाकूर यांनी यावेळी इराणी यांच्याकडे केंद्र शासनाच्या २०२०-२१ मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषक कार्यक्रमासाठी २००३ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यासाठीचे निवेदन दिले. 

स्मृती इराणी यांच्यासोबत यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा, राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद उपस्थित होते.  

"महाराष्ट्रात आम्ही काही समस्यांना तोंड देत आहोत. अनेक विषयांवर स्मृती इराणी यांच्यासोबत सविस्तर बोलणं झालं. या बैठकीतून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी आशा आहे. लहान मुलांसोबत आणि स्तनदा माता किंवा मग गर्भवती मातांसोबत आपण राजकारण नाही करु शकत. त्यामुळे महाराष्ट्राचे जे अडकेलेल पैसे आहेत. ते नक्की राज्याला मिळतील अशी आशा आहे", असं यशोमती ठाकूर यांनी इराणी यांच्यासोबतच्या भेटीनंतर सांगितलं.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीYashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेस