शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Yaas Cyclone: यास चक्रीवादळ; पश्चिम बंगाल, ओडिशातून अकरा लाख नागरिकांना हलविले, आज धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:06 IST

Yaas Cyclone Update:

भुवनेश्वर/कोलकाता :   ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धमरा बंदरानजीक धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ‘यास’ भीषण चक्रीवादळाचे स्वरुप घेत धमरा आणि चांदबाली दरम्यान धडकेल, असा अंदाज आहे, असे  भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा आणि भुवनेश्वर येथील विभागीय हवामान केंद्राचे हवामान शास्रज्ञ डाॅ. उमाशंकर दास यांनी सांगितले. प. बंगालमधून ८ लाख तर,  ओडिशातून ३ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून मंगळवारी दुपारपर्यंत ६० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले अहे. ‘यास’ किनारपट्टीवर धडकण्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ओडिशात ४५ आणि पश्चिम बंगालमध्ये ४५ पथके तैनात केली आहेत. पारादीप बंदरावरील कामकाज  मंगळवार दुपारपासून बंद करण्यात आले असून  बंदर परिसरातील मालवाहक वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच  ओडिशातील क्षेपणास्र केंद्राच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत उपाय योजण्यात आले आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून दक्षिण-पूर्व रेल्वेने बुधवारपर्यंत अनेक प्रवासी विशेष रेल्वे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त प्रदीप जेना यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना  बालासोर, भद्रक, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूण या चार किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतून लोकांना  मंगळवार दुपारपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जवळपास ७५०००० लोकांंसाठी  ७ हजार निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कसा आहे प्रवास?भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगाल उपसागराच्या पूर्व-मध्य क्षेत्रात ‘यास’ चक्रीवादळ तयार होत ते उत्तर आणि वायव्येकडून पारादीपच्या दक्षिण आणि आग्नेयकडे आणि बालासोरच्या दक्षिण-आग्नेयकडे कूच करील. २६ मे रोजी चक्रीवादळ अधिक तीव्र होत ताशी  १५५-१६५  किलोमीटर वेगाने भद्रक जिल्ह्यातील चांदबालीनजीक धडकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आणि नंतर सहा तास चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसेल. 

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाIndiaभारत