शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:32 IST

पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही.

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीतील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याने पंतप्रधानांना पत्र लिहिले. 

त्याने हे पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. यावेळी त्याने आपले पद्मश्री पदक रस्त्यावर ठेवले होते. शेवटी त्याने सोशल मीडियावर हे पत्र पोस्ट केले. पुनियाला २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी शुक्रवारी साक्षी मलिक यांच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांनी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा केली. या लढाईत कुस्तीपटूंना साथ देण्याचा शब्द त्यांनी दिला.

आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावे का? पत्रात केला सवालnब्रिजभूषण यांच्याविरोधातील पहिले आंदोलन सरकारच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. तीन महिने उलटूनही एफआयआर दाखल न झाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले. आंदोलन ४० दिवस चालले. nआमचे आंदोलनाचे स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हा आमची पदके गंगार्पण करण्याचा विचार केला होता; पण आम्हाला प्रशिक्षक व शेतकऱ्यांनी तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यांनी आम्हाला परत येण्यास सांगितले.nआम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबवले. २१ डिसेंबर रोजी ब्रिजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी ‘आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील’ असे विधान केले. 

‘आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली. कुठे जावे, काय करावे समजत नव्हते. सरकार व लोकांनी खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?’ अशी भावना पुनियाने या पत्रात व्यक्त केली. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंह