शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांनी आमच्या 'मन की बात' ऐकावी, ब्रिजभूषण गुन्हेगार; आंदोलक पैलवानांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 18:23 IST

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या आठ दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचा संप सुरू आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या आठ दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचेआंदोलन सुरू आहे. या संपादरम्यान पैलवानांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ला न्याय मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असं पै. बजरंग पुनिया यावेळी म्हणाला. 

'कुटुंबवाद तिकडे सुरू आहे'बजरंग पुनिया पुढे म्हणाले की, फेडरेशन आमच्या संपाला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कोणाचा ताबा मागत नाही आहोत. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. कुटुंबवादाच्या मुद्द्यावर पुनिया म्हणाला की, सगळा कुटुंबवाद तिकडेच होत आहे आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. 

आमच्यापेकी कोणत्याही खेळाडूचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु ब्रिजभूषण यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांनी कोणते मोठए काम केले, ज्यामुळे त्यांना फुलांचा हार घालण्यात येत आहे. यापेक्षा मोठा गुन्हेगार भारतात नाही, अशी टीकाही पुनिया याने केली आहे. 

'अनेक राज्यातील खेळाडुंचा पाठिंबा'यावेळी विनेश फोगट म्हणाली की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेवर काही बोलणार नाही? अनेक राज्यांतील खेळाडू पाठिंबा देत आहेत. पंतप्रधानांनी आमच्या मनाचेही ऐकावे. कोट्यवधी लोक आमच्या पाठिशी आहेत, हीच आमची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया पै. विनेश फोगट हिने यावेळी दिली.

ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखलमहिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले. महिला कुस्तीपटूंकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दोन एफआयआरमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीNew Delhiनवी दिल्लीagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात