शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपासोबत युती केली नसती तर निवडणुकीत आणखी 15 जागा सहज जिंकल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 10:49 IST

ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती.

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला पुरेशी मदत न मिळाल्याच्या कारणावरून रालोआतून बाहेर पडणारे तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आता भाजपाचे जाहीर वाभाडे काढायला सुरूवात केली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल म्हणून आम्ही भाजपाला साथ दिली. मात्र, भाजपाने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आमच्या पदरात काहीच न पडता निवडणुकीत विनाकारण 15 जागा गमवाव्या लागल्या, अशी टीका चंद्राबाबू यांनी केली. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही भाजपशी युती केली. ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती. तेव्हा आम्ही युती न करता स्वतंत्रपणे लढलो असतो तर टीडीपीला आणखी 15 जागा सहज मिळाल्या असत्या. विशेष राज्याचा दर्जा देतो, असे सांगून भाजपाने आमची अक्षरश: फसवणूक केल्याचे चंद्राबाबू यांची टीडीपीच्या 37 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सांगितले. आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा न दिला गेल्याने आणि आंध्र प्रदेशच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे कारण देत चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर आंध्र पद्रेशला विशेष राज्याचा दर्जा दिला तर बिहार, झारखंड, ओदिशा अशी सगळीच राज्ये विशेष राज्याचा दर्जा मागतील असे म्हणत ही मागणी अर्थमंत्री अरूण जेटलींनी फेटाळली होती. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चंद्राबाबू यांचा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. चंद्राबाबू यांचा निर्णय पूर्णतः राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. टीडीपीला आंध्र प्रदेशच्या विकासाची काळजी नसल्यानं त्यांनी एनडीएपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची टीका शाह यांनी केली होती. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी