शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:51 IST

महिलेचा २६ आठवड्यांचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद...

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी विवाहित महिलेला तिची २६ आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी देण्याच्या ९ ऑक्टोबरचा आदेश मागे घेण्याच्या केंद्राच्या याचिकेवर बुधवारी स्वतंत्र निर्णय दिला. एका न्यायाधीशांनी गर्भपाताला परवानगी देण्याबाबत नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या न्यायाधीशांनी महिलेच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असे म्हटले.

गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा असे कोणते न्यायालय म्हणेल असा प्रश्न न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी विचारला. त्या म्हणाल्या की, त्या २७ वर्षीय महिलेला गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही. त्याचवेळी न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाले की, गर्भपात करण्याचा आग्रह धरणाऱ्या महिलेच्या निर्णयाचा कोर्टाने आदर केला पाहिजे.

दोन न्यायाधीशांमधील मतभेद लक्षात घेता, ही याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पूर्वीचा अहवाल अधिक स्पष्ट का नव्हता? न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या की,एम्सच्या वैद्यकीय मंडळाने ६ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या अहवालाचा विचार करून सुप्रीम कोर्टाने महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. कोर्टाचे कामकाज सुरू होताच न्यायमूर्ती हिमा कोहली आणि बी.व्ही. नागरत्ना यांच्या पीठाने विचारले की, ‘जर पूर्वीच्या अहवालानंतर २ दिवसांनी डॉक्टर इतके स्पष्टपणे भ्रूण जिवंत राहील असे म्हणतात, तर पूर्वीचा अहवाल  तपशीलवार आणि अधिक स्पष्ट का नव्हता?’ 

आधीच्या आदेशात काय? न्यायालयाने आधीच्या ९ ऑक्टोबरच्या आदेशात नमूद केले होते की, महिला नैराश्याने ग्रस्त होती आणि ती भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तिसरे मूल वाढविण्याच्या स्थितीत नाही. महिलेला दोन मुले आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAbortionगर्भपातCourtन्यायालय