शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! पाच वर्षांत ग्रामीण मजुरीत अपेक्षित वाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:20 IST

गावच्या अर्थव्यवस्थेचे संकट गडद; यूपीएच्या तुलनेत परिस्थिती खराब

नवी दिल्ली : भारतातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या लोकांचा मजुरी दर डिसेंबरमध्ये वार्षिक आधारावर ३.८ टक्क्यांनी वाढला आहे. या महिन्यातील ही सर्वात कमी वाढ आहे. त्यासोबतच शेतमालाच्या किंमतीबाबतही शेतकरी नाराज आहेत. कारण, डिसेंबरमध्ये वार्षिक घाऊक चलनवाढ अन्नधान्यासाठी उणे ०.०७ टक्के होती. तर, बिगर अन्नधान्य सामुग्रीसाठी ४.४५ टक्के होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची ही परिस्थिती त्यांचा तणाव दर्शविते.डिसेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय दैनिक ग्रामीण मजुरी दर ३२२.६२ रुपये होता. जो मागील वर्षाच्या तुलनेत ३.८४ टक्के अधिक होता. त्यापूर्वीच्या वर्षात राष्ट्रीय दैनिक ग्रामीण मजुरी दर ३१०.६९ रुपये होता. एनडीए सरकारच्या काळात डिसेंबर महिन्यात २०१४ ते २०१८ या काळात ४.२ टक्के महागाई दरानंतर खूपच कमी म्हणजे ४.७ टक्के आणि वास्तविक केवळ ०.५ टक्के वाढ झाली. २००९ ते २०१३ या काळात यूपीए सरकार सत्तेवर असताना ग्रामीण मजुरी दर सरासरी १७.८ टक्के दराने वाढला. कृषि क्षेत्रातील कामगारांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांक सरासरी ११.१ टक्के राहिला. तर, मजुरीत प्रतिवर्ष ६.७ टक्के वाढ राहिली. गत पाच वर्षात ग्रामीण मजुरीत मंदी दिसून आली. गत पाच वर्षात कमी मजुरी वृद्धी कृषिशी संबंधित भागातच मर्यादित राहिली नाही. कामगार खात्याच्या आकडेवारीनुसार, कृषिशी संबंधित प्रमुख कामांमध्ये म्हणजे पेरणी, कापणी, बागकाम, पशुसंवर्धन, सामान्य शेतीची कामे यात सरासरी वृद्धी दर ५.१४ टक्के राहिला.शेतमालालाही भाव नाहीया काळात शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या किंमतीमध्ये खूपच कमी वाढीचा अनुभव आला. कृषि मजुरीतही अधिक वाढ झाली नाही.