शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:52 IST

भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमस्वातंत्र्य असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून, 180 देशांमध्ये भारताला 140 वे स्थान मिळाले आहे. तसेच निवडणूक प्रचारासा काळ हा भारतातील पत्रकारांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 म्हणजेच जागतिक माध्यमस्वातंत्र क्रमवारी 2019 मध्ये नॉर्वेने अव्वलस्थान पटकावले आहे. जगभरात पत्रकारांबाबत द्वेशाची भावना वाढत चालली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी किमान सहा पत्रकारांची हत्या केली गेली. भारतात पत्रकारांसोबत होणाऱ्या हिंसेमध्ये पोलिसांकडून होणारी हिंसा, नक्षलवाद्यांकडून होणारी हिंसा, गुन्हेगारी समूह आणि राजकारण्यांकडून घेण्यात येणाऱ्या बदल्याचा समावेश आहे.  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्स ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे. या संस्थेकडून जगभरात पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचे एकत्रिकरण करण्याचे काम केले जाते. पत्रकारांबाबत असलेल्या द्वेषाचे हिंसेत रूपांतर होत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण वाढले आहे, असे 2019 ची क्रमवारी तयार करताना  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सच्या निदर्शनास आले आहे.  भारतात हिंदुत्वाविरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांविरोधात सोशल मीडियावर चालवण्यात येणाऱ्या द्वेषकारक अभियानांबाबत या अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. तसेच मी टू अभियानामधून महिला वार्ताहरांच्या लैंगिक शोषणाबाबत समोर आलेल्या घटनांचाही यात उल्लेख आहे. दक्षिण आशियाचा विचार केल्यास माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत स्थान मिळालेल्या 180 देशांच्या यादीत भारत 140 व्या, पाकिस्तान 142 व्या, बांगलादेश 150 व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत नॉर्वे प्रथम तर फिनलँड दुसऱ्या स्थानी आहे.   

टॅग्स :Mediaमाध्यमेInternationalआंतरराष्ट्रीय