नवी दिल्ली : अमेरिकेत वास्तव्याला असलेले हिंदू बांधव आणि त्यांच्या प्रार्थनास्थळावर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांबाबत लोकसभेत बुधवारी चिंता व्यक्त करण्यात आली. सरकारने हा मुद्दा अमेरिकन सरकारपुढे उपस्थित करावा, अशी मागणी सदस्यांनी केली.शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना जगभरातील अनेक देशांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात हल्ल्याचे लक्ष्य ठरत आहेत, असे सांगितले.
अमेरिकेत हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता
By admin | Updated: August 5, 2015 23:15 IST