शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना रुग्णालयात निकृष्ट जेवण; भाजी अन् डाळीत सापडले किडे, रुग्ण संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 08:57 IST

CoronaVirus News: भाजी आणि डाळीत किडे सापडल्यानं रुग्ण संतप्त; जेवण फेकून देत घातला गोंधळ

हमीरपूर: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाच्या एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. आता एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात हाच आकडा सव्वा लाखांवर गेला आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. अनेक रुग्णालयांमध्ये सुविधांची बोंब आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातल्या एका कोविड रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.आक्रोश....आई द्या हो, मला माझे बाबा हवेत!उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं. भाजी आणि डाळीत किडे आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्ण संतापले. त्यांनी जेवण फेकून देत गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सीएमओनं प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मोठा दिलासा! एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिकहमीरपूर जनपदच्या सुमेरपूरमध्ये असलेल्या पॉलिटेक्निक वसतीगृहाचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलं आहे. या ठिकाणी १३० कोरोना रुग्ण आहेत. काल सकाळी या रुग्णांना नाश्ता आणि चहा देण्यात आला. दुपारच्या जेवणात डाळ आणि पोळी देण्यात आली. एका रुग्णानं डाळीत पोळीचा तुकडा बुडवला. तर त्यात त्याला किडा दिसला. त्यानंतर त्यानं आरडाओरडा केला. सगळ्या रुग्मांनी त्यांच्या ताटातील डाळ आणि पोळी पाहिली. त्यातही किडे होते. यानंतर रुग्णालयात एकच गदारोळ झाला.सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरलरुग्णांनी गोंधळ घातल्यामुळे कर्मचारी भांबावून गेले. यानंतर रुग्णांची समजूत काढण्यात आली. त्यांना भाजी दिली गेली. मात्र त्यातही किडे सापडले. त्यामुळे रुग्ण अधिकच संतापले. त्यांनी जेवण फेकून देत गोंधळ घातला. रुग्णालयात उपचार घेत असलेले टिकरौली गावचे रहिवासी बृजमोहन साहू यांनी घटनेचा व्हिडीओ चित्रित करून तो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर सीएमओनं प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या