शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Worlds Population: या मुलीच्या जन्मासह जगाची लोकसंख्या पोहोचली 800 कोटींवर; कोण आहे ही चिमुकली..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:42 IST

आज जगातील लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा ओलांडला असून, गेल्या 48 वर्षात यात दुपटीने वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: आज जगाची एकूण लोकसंख्या आता 800 कोटींवर पोहोचली आहे. हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. वाढती लोकसंख्या हे चिंतेचे कारण असले तरीदेखील लोकांमध्ये उत्सुकता आहे की, 800 कोटीवे मूल कोण आहे?

बाळाचा जन्म कुठे झाला?जगातील 800 कोटीव्या मुलाचा जन्म कुठे झाला, याबाबात अनेकजण गूगलवर सर्च करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या मुलाचा जन्म सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन किंवा भारतात झाला नाही. या चिमुकलीचा जन्म फिलीपिन्सची राजधानी मनिला इथे झाला आहे. आज सकाळी मनिलामध्ये एका मुलीचा जन्म झाला असून ती जगातील 800 कोटी नंबरची मुलगी असल्याचा दावा केला जात आहे.

बाळाचे पालक खूप आनंदीनोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला. या नवजात बालकाचे नाव विनिस मबनसाग ठेवण्यात आले आहे. तिची आई खूप आनंदित आहे. ती म्हणाली की, माझ्या मुलीला जगातील 8 अब्जवे मूल मानले जात असल्याचा आनंद आहे. कमिशन फॉर पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट (POPCOM) चे मुख्य प्रशासकीय अधिकारी लिनथ थेरेसे मोन्साल्वे म्हणाले की, विनिस भविष्यात विकासाचे रोल मॉडेल बनेल अशी अपेक्षा करू.

48 वर्षात जगाची लोकसंख्या दुप्पट जगाची लोकसंख्या आज 8 अब्ज झाली आहे, यामुळे भविष्यात अन्नधान्यासह इतर गरजांची कमतरता भासू शकते. पण, तज्ञांच्या मते या शतकात एक वेळ अशी येईल, जेव्हा लोकसंख्या वाढ स्थिर होईल आणि नंतर घट देखील दिसून येईल. मात्र गेल्या 48 वर्षांत झालेली लोकसंख्या धक्कादायक आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 4 अब्ज होती, ती आता 8 अब्जच्या पुढे गेली आहे. 1950 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त अडीच अब्ज होती. एवढेच नाही तर 2086 हे असे वर्ष असेल, जेव्हा या जगातील मानवांची लोकसंख्या 10.6 अब्जांच्या पुढे जाईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका