शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 05:56 IST

Corona Vaccination कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास भारत सज्ज झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. कोरोनावरील लसी विकसित करणाऱ्या शास्रज्ञांचे मोदी यांनी अभिनंदन केले.

कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी हे वक्तव्य केले. मेट्रॉलॉजी परिषदेमध्ये मोेदी म्हणाले की, विकसित झालेल्या कोरोना लसी भारतात बनल्या असून, त्याचा देशाला सार्थ अभिमान आहे. शास्रज्ञ व तंत्रज्ञांनी दिलेल्या योगदानामुळेच ही गोष्ट शक्य झाली.

कोविशिल्ड लसीच्या संशोधन व उत्पादनात सीरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा आहे, तर भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. मोदी यांनी नॅशनल अ‍ॅटोमिक टाइमस्केल व भारतीय निर्देशांक द्रव्य प्रणाली देशाला समर्पित केली. नॅशनल एन्व्हॉयर्नमेन्टल स्टॅण्डर्ड्स लॅबोरेटरीचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाले. 

आम्हाला प्रत्येकाचे मन जिंकायचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दर्जेदार भारतीय वस्तूंच्या माध्यमातून जगातील प्रत्येकाचे मन आम्हाला जिंकायचे आहे. देशातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रात तयार झालेली वस्तू उत्तम दर्जाचीच असायला हवी.

विज्ञान हा माझा प्राणवायू आहे. मला विज्ञानापासून ऊर्जा मिळत असते. आमच्या कंपनीला जगभरातील १२३ देशांना लसीचा पुरवठा करण्याचा अनुभव आहे. झिका विषाणूवरील लसीसाठी पेटंट दाखल करण्यात आम्ही आघाडीवर होतो. - डॉ. कृष्णा इल्ला, अध्यक्ष, भारत बायोटेक

 मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या करण्यास भारत बायोटेक या कंपनीला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.

सौदीच्या सीमा खुल्यानव्या कोरोना विषाणूमुळे संसर्ग अधिक फैलावू नये, म्हणून सौदी अरेबियाने दोन आठवड्यांसाठी बंद केलेल्या आपल्या सीमा रविवारपासून खुल्या केल्या व आंतरराष्ट्रीय विमानांना केलेली प्रवेशबंदीही उठविली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी