शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सुरू झाला लसोत्सव...!; जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 00:57 IST

भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले.

ठळक मुद्देस्वदेशी लसींनी कोरोनाला हरविणार - पंतप्रधान नरेंद्र मोदीकोरोनाचा शेवट करायला सज्ज व्हा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकोरोना प्रतिबंधक लस हे संजीवनी औषध - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये शनिवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झाली. कोरोना साथीने देशात दहा महिन्यांत एक कोटीपेक्षा जास्त लोक बाधित झाले असून दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असलेली लसीकरण मोहीम सुरू झाल्याने भारतीयांना आता दिलासा मिळाला आहे. राज्यातही या मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला.भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले. जगात ३ कोटी लोकसंख्या असलेले १०० पेक्षा जास्त देश आहेत. त्यांच्या तुलनेत भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच प्राधान्याने डॉक्टर, आरोग्यसेवक, कोरोना योद्धे अशा तीन कोटी लोकांना लस देणार आहे. ५० वर्षे वयाच्या पुढील तसेच एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या ५० वर्षांखालील व्यक्ती यांसह २७ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात येईल. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोविशिल्ड लस तसेच भारत बायोटेक कंपनीने बनविलेल्या कोवॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली व त्यानंतर काही दिवसातच कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरुवात झाली आहे. कोवॅक्सिन, कोविशिल्ड या लसी दोन डोसच्या आहेत. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोज देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी देशातील प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशात केंद्र उभारण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी सुमारे ६ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना लस घेणे हे सक्तीचे नाही.

...तर भारत बायोटेक देणार नुकसानभरपाई ‘कोव्हॅक्सिन’ या लसीमुळे काही दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई करणार असल्याचे भारत बायोटेकने जाहीर केले. सौम्य किंवा गंभीर दुष्परिणाम आढळून आल्यास सरकारमान्य रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील. 

कुणावरही दुष्परिणाम नाही -लसीकरणाचा पहिल्या दिवसाअखेर कोणालाही दुष्परिणाम किंवा रुग्णालयात दाखल करण्याची घटना घडलेली नाही. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १ लाख ९१हजार १८१णांना लस देण्यात आली आहे. देशभरात ३३५१ केंद्रांवर एकूण १६ हजार ७५५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

देशात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिली पहिली लस -देशात लसीकरण मोहिमेमध्ये पहिली लस दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील मनीषकुमार या स्वच्छता कर्मचाऱ्याला देण्यात आली. 

महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी सुमारे -१८,३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. हे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. तर राज्यात दिवसभरात मुंबईत सर्वाधिक १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

दवाई भी, कडाई भी -  नरेंद्र मोदीलस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे. ‘दवाई भी, कडाई भी’ (औषधही व नियमांचे पालनही) ही घोषणा नागरिकांनी कायम ध्यानात ठेवायची आहे. संकट अद्याप संपलेले नाही - उद्धव ठाकरेकोविडवरील लस येणार, लसीकरण सुरू हाेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर लसीकरणाचा दिवस शनिवारी उजाडला. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत. आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

स्मार्ट फोन नसलेल्यांची होणार पंचाईत -लस घेऊ इच्छिणाऱ्याने को-विन अ‍ॅपवर स्वत:च्या नावाची नोंदणी करायची आहे. भारतातील अनेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही. अशा नागरिकांने काय करावे, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे