जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल : दर 40 सेकंदांना एकाला जीव नकोसा
जिनिव्हा : जगात 2012 मध्ये सर्वाधिक आत्महत्या भारतात झाल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे.
हूच्या दक्षिण पूर्व आशिया विभागात हा आत्महत्येचा अंदाजे दर हा हूच्या अन्य विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या आत्महत्या करणा:यांत तरुण आणि वृद्धांची जास्त संख्या आहे.
जगात सर्वाधिक आत्महत्या या दक्षिण-पूर्व आशिया विभागात (दक्षिण-पूर्व आशियातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत 39 टक्के) होतात. 2०12 मध्ये भारतात 258क्75 लोकांनी आत्महत्या केल्या त्यात 99977 महिला होत्या. भारतातील आत्महत्येचा दर हा दर 1 लाख लोकांमागे 21.1 टक्के आहे. अशा प्रकारचा अहवाल हूने प्रथमच प्रसिद्ध केला आहे. त्यात जगातील आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचे यशस्वीपणो रोखलेले प्रयत्नांचे व्यापक चित्र आहे, असे हूच्या मेंटल हेल्थ अँड सबस्टॅन्स अब्यूज विभागाचे संचालक डॉ. शेखर सक्सेना यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
4आत्महत्याप्रवण देशांत गुयाना (दर 1 लाखामागे 44.2) व उत्तर व दक्षिण कोरिया (दर एक लाखामागे अनुक्रमे 38.5 व 28.9).