शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांचा गरीब देश; देशातील एकूण संपत्तीचा निम्मा वाटा अवघ्या 1 टक्के लोकांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 10:44 IST

ऑक्सफॅमच्या अहवालातून गरीब-श्रीमंतांमधील वाढती दरी पुन्हा एकदा अधोरेखित

नवी दिल्ली: गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी वाढतच चालल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतातील 10 टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के इतकी संपत्ती आहे. या 10 टक्क्यांपैकी 1 टक्का मंडळी इतकी श्रीमंत आहेत की, त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीच्या 51.53 टक्के इतकी संपत्ती आहे. तर 60 टक्के लोकसंख्येकडे केवळ 4.8 टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. दाओसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वी ऑक्सफॅमचा अहवाल जाहीर होतो. 2018 ते 2022 या काळात भारतातील श्रीमंतांच्या संख्येत प्रत्येक दिवशी 70 जणांची वाढ होईल, असा अंदाज ऑक्सफॅमनं वर्तवला आहे. 2018 मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या 18 नं वाढली. सध्या देशातील अब्जाधीशांची संख्या 119 इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल 28 लाख कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या कोट्याधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये प्रत्येक दिवसाकाठी 2200 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील 1 टक्का लोकांची संपत्ती गेल्या वर्षभरात 39 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील केवळ 9 टक्के श्रीमंत लोकांकडे असलेली संपत्ती आणि 50 टक्के गरीब लोकांकडे असलेली संपत्ती जवळपास सारखीच आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची आर्थिक प्रगती अतिशय संथगतीनं झाली आहे. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्ती वाढीचा वेग केवळ तीन टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारी विचारात घेतल्यास कोट्याधीशांच्या संपत्तीत दर दिवशी 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.  

टॅग्स :Indiaभारत