शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'; मोदींकडून अभिनंदन अन् सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 19:16 IST

गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अभिनंदन केले

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: योगासने आणि सूर्यनमस्कार करुन शारिरीक तंदुरुस्त जपतात. मोदींच्या प्रयत्नातूनच जगभरात भारतीय योगाभ्यास आणि योगासने पोहोचली. त्यामुळेच, जागतिक योग दिनही साजरा होऊ लागला. भारतीय संस्कृती आणि परंपरेत योगासने आणि योगविद्येला अधिक महत्त्व आहे. त्यात, सूर्यनमस्काराचेही विशेष महत्व आहे. याच सूर्यनमस्काराच्या सामूहिक कृतीतून गुजरातने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपलं नावं केलंय. एकाचवेळी १०८ ठिकाणी हा सूर्यनमस्कार घालण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा विक्रम गुजरातने केला आहे. 

गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा, असे आवाहनही मोदींनी केले. पंतप्रधानांनी ट्विटरवरुन काही फोटो शेअर करत या समाज माध्यमावर पोस्ट केले आहेत. त्यासोबत म्हटले की, "गुजरातने २०२४ चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे - सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, १०८ क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी वचनबद्धतेचा हाच खरा पुरावा आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”, असे ट्विट मोदींनी केले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातYogaयोगासने प्रकार व फायदे