शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : आरोग्य, समृद्धी, शांततेसाठी भारतात या : मोदींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 04:08 IST

धनसंपदेसोबतच आरोग्यदायी व परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तथा शांततेसाठी भारतात या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातीय बड्या कंपन्यांच्या सीईओंना केले. भारत म्हणजे व्यवसायासाठीचे योग्य ठिकाण, असेही मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून पटवून सांगितले.

दावोस : धनसंपदेसोबतच आरोग्यदायी व परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तथा शांततेसाठी भारतात या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातीय बड्या कंपन्यांच्या सीईओंना केले. भारत म्हणजे व्यवसायासाठीचे योग्य ठिकाण, असेही मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून पटवून सांगितले.सध्याच्या काळात माहिती हीच खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे माहिती आहे व ती नियंत्रित करण्याची क्षमता आहे, त्याच्या हाती भविष्यात नेतृत्वाची धुरा असेल. जागतिक स्तरावर माहितीच्या प्रवाहामुळे जशा अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, तशीच आव्हानेही उभी ठाकली आहेत. तंत्रज्ञानावर आधारित बदलांमुळे लोकांची विचारसरणी, कार्यशैली, राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय गटांचे स्वरूप या सर्वांवरच खोल परिणाम झाला आहे.सब का साथ, सब का विकास-भारतीय मतदारांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार सत्तेत येईल, असा कौल दिला. असा बदल देशात ३० वर्षांनी घडला. आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा मुद्दा घेऊन राज्यकारभार करीत आहोत. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे ध्येय आहे. त्यानुसारच आम्ही सर्व धोरणांची आखणी केली आहे.२१ वर्षांत जीडीपी सहापट वाढला-दावोसमधील १९९७ व २०१८ मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकांची तुलना करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, १९९७ साली फोरमच्या बैठकीला भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा उपस्थित राहिले होते. त्या वेळी भारताचा जीडीपी ४०० अब्ज डॉलर इतका होता. आज त्यात सहापट वाढ झाली आहे.‘वसुधैव कुटुंबकम्’ असे भारतीय तत्त्वज्ञानात म्हटले आहे. सारे मतभेद मिटविण्यासाठी भारतीय विचार उपयुक्त आहेत. त्यामुळे शांतता, स्थैर्य, विकास यांच्यातील अडसरही दूर करता येतील, असेही मोदी यांनी म्हटले. लोकशाही व्यवस्था व विविधता यांचा भारतीयांना अभिमान वाटतो. भारतीय समाजात विविध धर्म, संस्कृती, भाषा एकत्र नांदतात. अशा भारतीय समाजासाठी लोकशाही ही जीवनशैली आहे.

टॅग्स :World Economic Forum 2018जागतिक आर्थिक फोरम 2018Narendra Modiनरेंद्र मोदी