शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांसाठी कायपण! मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापानं बनवली 'मिनी ऑटो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 22:21 IST

केरळमधील अरुण कुमार यांचा मुलगा माधवकृष्णा यास 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल फिल्म ‘ए ऑटो’ अत्यंत आवडली होती. त्याची इच्छा होती कि त्याच्याजवळही एक अशी ऑटो रिक्षा असावी.

कोची - बाप तो बाप असतो, आपल्या लेकीच्या हट्टासाठी तो काहीही करायची तयारी ठेवतो. आईचं मुलावर अन् बापाचं मुलीवर सर्वाधिक प्रेम असतं. म्हणून तर मुलीला सासरी पोहोचवताना एकीकडे बापाच्या पोटात आनंद मावत नसतो, तर दुसरीकडे तिच्या दूर जाण्यामुळं डोळ्यातलं पाणीही तो थांबवू शकत नसतो. तर मुलाच्या यशानंतर सर्वाधिक हुरळून जाणाराही बापच असतो. केरळमधील अरुण कुमार पुरुशोथमन या बापमाणसानेही असे काही केले कि, जगभरात त्याची चर्चा होत आहे. आपल्या लाडक्या लेकरांसाठी त्यांनी चक्क लहान आकाराची हुबेहुब रिक्षा बनवली. सध्या, सोशल मीडियावर या रिक्षाचे फोटो व्हायरल होत आहेत.

केरळमधील अरुण कुमार यांना 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल चित्रपट ‘ए ऑटो’ पासून रिक्षा बनविण्यासाठी प्रेरणा मिळाली होती. अरुण यांच्या मुलाची इच्छा होती कि त्याच्याजवळही एक तशीच ऑटो रिक्षा असावी. त्याने आपल्या वडिलांना अनेकदा तसे बोलूनही दाखवले. शेवटी वडिलांनी त्यांच्या मनातली सुप्त इच्छा ओळखली. मात्र, अरुण कुमार आपल्या मुलांना लाख रुपयांची मोठी ऑटो रिक्षा देऊ शकत नव्हते. कारण, त्यांचा मुलगा अजून लहान होता. पण, मुलाची हौस भागविण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. आपल्या मुलांसाठी अरुणकुमार यांनी मिनी रिक्षाच बनवली. विशेष म्हणजे अरुण यांनी बनवलेली रिक्षा ही केवळ खेळणी नसून ती मोठ्या ऑटो रिक्षाप्रमाणे धावतेसुद्धा. विशेष म्हणजे ऑटो रिक्षाप्रमाणेच या मिनी रिक्षातही सर्व फंक्शन कार्यरत असून अरुणने स्वत: ही रिक्षा बनवली आहे. 

अरुणलाही लहानपणी गाड्यांशी खेळायचा खूप छंद होता. मात्र, घरची परिस्थिती गरीब असल्यानं त्यांनाही लहानपणी अशी खेळणी मिळत नसायची. त्यावेळी, त्यांच्या वडिलांनी एक लहान सायकल अरुण यांना दिली. ती लहान सायकल पाहून अरुण यांनी अनेक लहान-सहान खेळणी बनवली. तर, दहावीत असताना जेसीबी मशिनचे लहानसे मिनी मॉडेलही बनवले होते. त्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करतानाही अरुण यांना त्यांचे बालपण आठवले. आपल्या बालपणीच्या आठवणी आणि धंद यांची सांगड घालून अरुण यांनी मिनी रिक्षा बनविण्यासाठी बाजारातून सामान खरेदी केली. आपल्या हस्तकलेतून त्यांनी ही मिनी ऑटो उभारुन आपल्या मुलांना भेट दिली. त्यानंतर, अरुण यांच्या दोन्ही मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालता. तर, अरुण यांनाही लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. ही रिक्षा बनविण्यासाठी अरुण यांना 7 महिन्यांचा कालावधी लागला असून त्यांनी रिक्षाचे नाव सुंदरी असे ठेवले आहे.

पाहा व्हिडीओ-

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाKeralaकेरळSocial Viralसोशल व्हायरल