शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ वरून १२ करणार?; जाणून घ्या 'त्या' बैठकीत काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 18:18 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कामाचे तास वाढवण्याची मागणी

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचं मोठं नुकसान झालं आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आता योजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही राज्यांनी कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांतच त्यांनी हा निर्णय मागे घेतला. आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. मात्र कामाचे तास वाढवायचे झाल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम द्यावा लागेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिली आहे.कामगारांविषयक प्रश्नांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीची काल महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी भाजपा खासदार भातृहारी महताब यांच्या नेतृत्त्वाखालील समितीला सर्व तांत्रिक बाबींची आणि नियमांची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं औद्योगिक नुकसान भरून काढण्यासाठी नऊ राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; रेल्वेमंत्र्यांची माहितीदेशातल्या नऊ राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ वरून १२ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला बराच विरोध झाल्यानं निर्णय मागे घेण्यात आला. कामाचे तास वाढवण्याला कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवल्यानं हा निर्णय रद्द करण्यात आला. कामाचे तास ८ वरून १२ केल्यावर कामगार कायद्याचं उल्लंघन होतं का, याबद्दलचे महताब यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं कामगार आणि रोजगार मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले.

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'भारत आंतरराष्ट्रीय कामगार  संघटनेचा (आयएलओ) सदस्य असल्यानं कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ वरून १२ केल्यास ते नियमांचं उल्लंघन ठरेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी समितीला दिल्याचं वृत्त पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. कामाचे तास वाढवायचे असल्यास कर्मचाऱ्यांना अधिकच्या सुविधा द्याव्या लागतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामाचे तास वाढल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम द्यावा लागेल, अन्यथा त्यांना अधिकच्या सुट्ट्या द्यावी लागतील, अशी कायद्यातील तरतूद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी समितीला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या