नोकरीचे ठिकाण म्हणजे आपले दुसरे घर असते. आपण आपल्या कुटुंबाला जेवढा वेळ देत नाही तेवढा वेळ कंपनीमध्ये देतो. अनेक कर्मचारी २०- २० वर्षे एकाच कंपनीमध्ये काम करत असतात. पण, हीच नोकरी अचानक काही कारणास्तव गेल्याने दुख:ही होते, सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अॅमेझॉनच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. १७ वर्षे एकाच कंपनीमध्ये काम केल्यानंतर नोकरी गमावल्यानंतर तो तो कर्मचारी भावनिक झाला.
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
ब्लाइंड या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर्मचाऱ्याने अनुभव शेअर केला. 'मी १७ वर्षांपासून सतत काम करत आहे. कधीही सुट्टी घेतलेली नाही, कधीही थांबलो नाही, मी स्वतःल कंपनीला परिवार मानत होतो. मी माझ्या मुलांनाही वेळ दिला नाही. पण मला एक दिवस मेल आला. या मेलमध्ये कामावरुन काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यावेळ मला काहीच कळत नव्हते. पाया खालची वाळू सरकली होती.मी फक्त रडू लागलो. सुमारे एक तासानंतर मी स्वतःला सावरले, त्यानंतर घरी कोणालाच काही सांगितले नाही.पत्नीला नाश्ता तयार करण्यास मदत केली आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलो. जेव्हा मी त्यांना हसताना पाहिले तेव्हा मला वाटले की कदाचित हेच जगायचे आहे.
कर्मचाऱ्याने पुढे पोस्टमध्ये लिहिले, यानंतर पत्नीला कॅफेमध्ये बोलावले आणि तिला सर्व माहिती दिली. यावेी तिला धक्का बसला, पण तिने मला सावरले. आपण एकत्र मिळून यातून बाहेर पडू असे मला सांगितले, यानंतर मला थोडा धीर आला.
"आता आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचे आहे"
आता तो कर्मचारी या अपयशाला एक नवीन संधी म्हणून पाहत आहे. "पुढे काय होईल हे मला माहित नाही. प्रत्येकजण म्हणत आहे की सध्या नोकरीमध्ये कठीण परिस्थिती आहे. परंतु गेल्या १७ वर्षांपासून मी ज्या पद्धतीने जगत आहे त्याप्रमाणे मला माझे जीवन जगायचे नाही. आता मला असे काहीतरी करायचे आहे ज्यामुळे मला शांती मिळेल." त्यांनी नोकरीवरून काढून टाकलेल्या इतरांना प्रोत्साहन देत म्हटले, "खंबीर राहा. हा शेवट नाही. स्वतःला दोष देऊ नका."
Web Summary : After 17 years, an employee was laid off from his job. He shared his emotional experience online, highlighting the shock and support he received from his wife. He now views it as a chance to prioritize peace over work.
Web Summary : 17 साल बाद एक कर्मचारी को नौकरी से निकाल दिया गया। उन्होंने अपने भावनात्मक अनुभव को ऑनलाइन साझा किया, जिसमें उन्हें अपनी पत्नी से मिले सदमे और समर्थन पर प्रकाश डाला गया। अब वह इसे काम पर शांति को प्राथमिकता देने के अवसर के रूप में देखते हैं।