काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जुने मंदिर सापडले. दरम्यान, आता प्रशासनाने तिथे असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर मोठी कारवाई सुरू केली आहे. हे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले आहे. या घरांचे बेकायदा भाग पाडले जात आहेत. घरांना असलेल्या बेकादेशीर बाल्कनी पाडण्याचे कमा सुरू आहे.
मजुरांचे पथक या घराचा काही भाग पाडत आहे. मंदिराशेजारी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते, त्यामुळे आता ते पाडले असल्याचे जमीनमालक मतीन यांनी सांगितले.
'जय हिंद, कोड पाठवा...', राष्ट्रपतींचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणुकीचा प्रयत्न
यापूर्वी एएसपींनी सांगितले होते की, जमीन मालकाने स्वतः अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. संभल मंदिरामागील बेकायदेशीर अतिक्रमणात ओळखले गेलेले जमीनमालक मतीन यांनीही घरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही असं सांगितले आहे. घराचा जो काही भाग अतिक्रमणमध्ये असेल तो काढला जाईल. आम्ही मुलांपेक्षा मंदिराची जास्त काळजी घेतली आहे, असंही ते म्हणाले.
काही दिवसापूर्वी प्रशासनाने वीज चोरी विरोधीत मोठी मोहिम सुरू केली होती. विज चोरी रोखण्यासाठी आलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने १९७८ पासून बंद असलेले हे मंदिर शोधून काढले. यानंतर १५ सप्टेंबर रोजी या मंदिरात विधी व मंत्रोच्चार करून पूजा आरती करण्यात आली. हे कार्तिक महादेवाचे मंदिर असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेनसिया यांनी दिली. येथे एक विहीर सापडली आहे, मंदिर सापडल्यानंतर येथे २४ तास सुरक्षेसाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. येथील अतिक्रमण काढण्यात येत आहे.