शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवेशाचा वाद; शबरीमला यात्रेवर सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:48 IST

अंमलबजावणीमुळे तणाव : कोर्टाचा आदेश पाळण्याचा तिढा कायम

निलक्कल (केरळ) : शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठीच्या बैठकीत तोडगा निघू न शकल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या यात्रेवर तणावाचे सावट आहे.

मंदिराचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्थान मंडळ, मंदिरातील मुख्य पुजारी व हे मंदिर ज्यांनी बांधले त्या पूर्वीच्या पंडालम राजघराण्याचे प्रतिनिधी यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला मंदिराचे पुजारी व राजघराण्याचे प्रतिनिधी गेले नव्हते.महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरू होते; परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी बुधवारी पूजेसाठी न येण्याची शक्यता आहे.महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महिलांच्या प्रवेशाबाबत निकालापूर्वीची स्थिती कायम ठेवावी यावर आम्ही ठाम आहोत. निर्णय देवस्थान मंडळाने घ्यायचा आहे, असे सांगून राजघराण्याचे प्रतिनिधी शशीकुमार वर्मा बैठकीला गेले. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की, न्यायालयात फेरविचार याचिका करण्याचा आम्ही आग्रह धरला; पण त्यावर १९ आॅक्टोबर रोजी बोलू, असे देवस्थानचे म्हणणे होते.बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही हे नक्की झाल्याने आम्ही उठून बाहेर आलो.

मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले की, फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील.

न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघालेले आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजप व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविल्याने निर्णय अमलात आणताना अडचणी येऊ शकतात. पोलीस अधीक्षक तिथे तळ ठोकून आहेत. महिलांना अडविणे सुरूनिलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठविताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरWomenमहिला