महिलांचा होणार सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:35 AM2018-01-20T03:35:51+5:302018-01-20T03:36:11+5:30

विविध क्षेत्रांत विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

Women will be honored, distributed today by the President at the hands of the President | महिलांचा होणार सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण

महिलांचा होणार सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण

Next

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांत या महिलांनी विक्रम केला आहे.
राज्यातील १५ महिलांमध्ये पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सातारा येथील सुरेखा यादव, बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे, अग्निशमन अधिकारी हर्षिनी कण्हेकर, आॅटोरिक्षाचालक शीला डावरे, आमदार डॉ.भारती लव्हेकर, चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ अरुणा राजे पाटील, भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी, कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाºया स्नेहा कामत, गुप्तहेर रजनी पंडित, असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आॅफ इंडियाच्या अध्यक्ष स्वाती परिमल, अंधांसाठी मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाºया उपासना मकाती, टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाºया स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा, डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी कलाकार १८ वर्षीय तारा आनंद यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका महाराष्ट्र कन्या दुगार्बाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्री पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Women will be honored, distributed today by the President at the hands of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.