शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अंगात आलंया! कोविड टीम येताच महिलांच्या अंगात आत्मा संचारला; थयाथया नाचू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:17 IST

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक; चाचणीसाठी वापरली जाणारी किट्सदेखी हिसकावली

जयपूर: देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. मात्र कोरोनाचे नवे व्हेरिएंट येण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागानं लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला आहे. मात्र काही ठिकाणी लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे लसीकरण आणि कोविड चाचणीत अडचणी येत आहेत. 

राजसमंद येथे आरोग्य विभागाचं पथक कोविड चाचणी करण्यासाठी पोहोचलं. त्यांना पाहताच महिला अंगात आत्मा संचारल्याचं नाटक करू लागल्या. त्यांनी आरडाओरड आणि दगडफेक सुरू केली. यामुळे घाबरलेल्या पथकानं तिथून पळ काढला. कुंभलगढमधील धानीन ग्राम पंचायतीत हा प्रकार घडला.

आरोग्य विभागाचं पथक बुधवारी मनरेगा साईटवर काम करणाऱ्या महिलांची कोरोना चाचणी करण्यासाठी पोहोचलं. कोविड चाचणीसाठी आवश्यक असणारे नमुने गोळा करण्यासाठी आलेल्या पथकाला पाहून महिलांनी विरोध सुरू केला. त्यांनी कोविड चाचणी करून घेण्यास नकार दिला. मात्र पथकातील कर्मचारी चाचणी करण्यावर ठाम होते. त्यामुळे महिलांनी अंगात आत्मा संचारल्याचं नाटक सुरू केलं. दोन महिलांनी शरीरात आत्मा आल्याचं नाटक करत पथकाला घाबरवलं. 

इथून पळून जा असं म्हणत महिलांनी पथकाला भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पथक माघार घेत नसल्याचं पाहताच तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे पथकातील सदस्य पळू लागले. तेव्हा तिथे असलेल्या तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या टेस्टिंग किट काढून घेतल्या. यादरम्यान पथकातील काहींना दुखापत झाली. या प्रकरणी अद्याप तरी कोणत्याही प्रकारची तक्रार न मिळाल्याचं चारभुजा पोलीस ठाण्याचे प्रमुख भवानी शंकर यांनी सांगितलं. आरोग्य पथकानं तक्रार नोंदवल्यास कारवाई करू असं शंकर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या