शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात, सियाचिनमध्ये १५ हजार फूट उंचीवर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 06:23 IST

देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात असलेल्या शिवा चौहान यांनी यानिमित्ताने मातृभूमीप्रति आपल्या प्रेमाला नवे परिमाण दिले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सच्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात तैनात केले आहे. कॅप्टन शिवा सियाचिनमध्ये १५,६३२ फूट उंचीवर कुमार पोस्टवर तैनात आहेत. या ठिकाणी दिवसा तापमान उणे २१ आणि रात्री उणे ३१ अंश सेल्सिअस आहे. यावरून येथील आव्हानांची कल्पना येऊ शकते. देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात असलेल्या शिवा चौहान यांनी यानिमित्ताने मातृभूमीप्रति आपल्या प्रेमाला नवे परिमाण दिले आहे. फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सला १४वा कॉर्प्स म्हटले जाते. नौदलाच्या ३०० अग्निवीर सैनिकांत ३४१ महिला आहेत. (वृत्तसंस्था) 

खडतर प्रशिक्षण केले पूर्णभारतीय सैन्याने प्रथमच एखाद्या महिलेला या धोकादायक पोस्टवर तैनात केले आहे. फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सने ट्विट केले आहे की, कॅप्टन शिवा चौहान या पोस्टवर तैनात होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हे जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे. शिवा यांनी या ठिकाणी तैनात होण्यापूर्वी अतिशय कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात बर्फाची भिंत ओलांडणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन मदत अभियान सरावाचा समावेश आहे.

- ३२0 रात्रीचे तापमान फायर ॲण्ड फुरी कॉर्प्सचे मुख्यालय लेहमध्ये आहे. ते सैन्याच्या उत्तरी कमांड अंतर्गत येते. त्यांच्या अंतर्गत होणारी नियुक्ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर होते. तसेच, ते सियाचिन ग्लेशियरचेही संरक्षण करतात. सध्या सियाचिनमध्ये दिवसाचे तापमान उणे २१ अंश सेल्सिअस आहे. तर, रात्रीचे तापमान उणे ३२ अंश सेल्सिअस आहे. कुमार पोस्टवर नेहमीच ३००० सैनिकांची उपस्थिती असते.

सैन्यात या महिलांची महिला जवान आणि हवाई दलात एअर वुमन म्हणून नियुक्ती होईल. - हरी कुमार, चीफ ॲडमिरल

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान