चंचल कम्युनिकेशनतर्फे महिला पत्रकारांचा सत्कार
By admin | Updated: March 12, 2016 00:33 IST
जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त चंचल कम्युनिकेशन, एल.एच. पाटील इंग्लिश मेडियम स्कूल,शिवशक्ती कार बाजार, गोपाळ स्टेशनरी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पत्रकार व विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
चंचल कम्युनिकेशनतर्फे महिला पत्रकारांचा सत्कार
जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त चंचल कम्युनिकेशन, एल.एच. पाटील इंग्लिश मेडियम स्कूल,शिवशक्ती कार बाजार, गोपाळ स्टेशनरी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पत्रकार व विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अश्विनी देशमुख, मनीष पात्रीकर, वैशाली पाटील, अर्चना तळेले, सुरेखा मोहरील उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक संजय मोहरील यांनी केले. मनोज पाटील, अविनाश् पाटील, हेमंत वैद्य यांचे सहकार्य लाभले. यांचा झाला सत्कार...पुष्पा पाटील, मंजुषा पात्रीकर, सुरेखा मोहरील, अर्चना तळेले, वैशाली पाटील, जयश्री पाटील, मनिषा मोहोळ, धनश्री बागूल, गौरी जोशी, गायत्री कुळकर्णी, मुनिरा तरवारी.