शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Women inspire: ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडून रुद्राली पाटीलचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 20:29 IST

साई फाऊंडेशनच्या प्रमुख अ‍ॅड. रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या आरोग्य, शिक्षण व कायदेविषयक जनजागरण उपक्रमांची ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ‘वूमेन इन्स्पायर’ मालिकेत दखल घेतली आहे.

लातूर : साई फाऊंडेशनच्या प्रमुख अ‍ॅड. रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या आरोग्य, शिक्षण व कायदेविषयक जनजागरण उपक्रमांची ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ‘वूमेन इन्स्पायर’ मालिकेत दखल घेतली आहे. आजवर भारतातील तीन संस्थांच्या कार्याचा आलेख उच्चायुक्तालयाने एका माहितीपटाद्वारे जगासमोर ठेवला असून, त्यात साई फाऊंडेशनची नोंद झाली आहे. 

भारतातील युवक-युवतींच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या संस्थांच्या सामाजिक योगदानाची दखल ब्रिटिश उच्चायुक्तालय घेत आहे. त्यात अ‍ॅड. रुद्राली पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट ब्रिटिश उच्चायुक्तालयाने प्रसारित केला. उदगीर परिसरात तसेच उत्तर प्रदेशमधील दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण व महिलांच्या हक्कांबाबत अ‍ॅड. रुद्राली पाटील व त्यांच्या चमूने जनजागरण केले. 

आपल्या अनुभवासंदर्भात रुद्राली म्हणाल्या, अकरावी वर्गात असताना उत्तर प्रदेशमधील एका गावात प्रवाह संस्थेच्या माध्यमातून शिबिराला उपस्थित राहता आले.  तिथे महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक इतकेच नव्हे, पडद्याबाहेर पडण्याची मुभा नसणे हे क्लेशदायी होते. स्वातंत्र्यानंतरचा प्रदीर्घ काळ उलटल्यानंतर शाळेत जातीभेद पाळला जात असल्याचे दिसले. त्याचवेळी आपण एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनजागरण केले पाहिजे, असे ठरविले होते. 

माझी आई डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे पाठबळ मिळाले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर फाऊंडेशनच्या माध्यमातून युवा सहकाऱ्यांसोबत उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रात उदगीर परिसर कार्यासाठी निवडला. ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, मुलींचे शिक्षण यावर भर दिला. आज महिलांच्या बाजूने कायद्याचे पाठबळ आहे. परंतु त्याविषयी पुरेशी माहिती बहुतांश महिलांना नाही. मी स्वत: कायद्याचे शिक्षण घेतले असल्याने त्यात अधिक रस घेऊन प्रबोधनाचे काम केले. शाळाबाह्य मुलांना प्रवेश मिळवून देणे असेल वा मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी प्रयत्न, ही सर्व कामाची सुरुवात आहे, असेही अ‍ॅड. रुद्राली पाटील यांनी सांगितले. युवा पिढीच परिवर्तन करेल... आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची जिद्द युवा पिढीकडे असून, तीच परिवर्तन घडवेल असे सांगत फाऊंडेशनच्या प्रमुख रुद्राली पाटील चाकूरकर म्हणाल्या, गावपातळीवर समाज बदलाचे काम पुढे नेण्यासाठी ब्रिटिश उच्चायुक्तालयातून प्रोत्साहन मिळाले आहे. रुद्राली या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नात आहेत. दरम्यान, साई फाऊंडेशन व उदगीरच्या लाईफ केअरने अन्य एका संस्थेला सोबत घेऊन मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्याचे योजिले आहे. 

टॅग्स :Womenमहिला