शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महिलांनो, करा घरातलीच कामे; जात्यावर दळण दळा, फरशा पुसा, पाणी भरा - राजस्थान सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 6:01 AM

महिलांनी सुदृढ राहण्यासाठी जात्यावर दळण दळावे, पाण्याच्या घागरी वाहाव्यात आणि घराच्या फरशा साफ कराव्यात, असा अजब सल्ला राजस्थान सरकारच्या शिक्षण खात्याने दिला आहे.

जयपूर : महिलांनी सुदृढ राहण्यासाठी जात्यावर दळण दळावे, पाण्याच्या घागरी वाहाव्यात आणि घराच्या फरशा साफ कराव्यात, असा अजब सल्ला राजस्थान सरकारच्या शिक्षण खात्याने दिला आहे.शिक्षकांसाठीच्या ‘शिविरा’ या मासिकाच्या नोव्हेंबरच्या अंकात हा सल्ला आहे. ‘स्वस्थ रहने के सरल उपाय’ या लेखात कोका-कोला, पेप्सी पिऊ नका, मॉर्निंग वॉक, धावणे, सायकल चालविणे, घोडेस्वारी, पोहणे आदी व्यायाम करा, असा सल्ला आहे. महिलांना मात्र घरकामातूनच व्यायाम होतो, असेही लिहिले आहे. जात्यावर दळणे, घागरींनी पाणी भरणे, फरशा साफ करणे आदी कामे केल्यास महिला सुदृढ राहू शकतात, असे त्यात लिहिले आहे. (वृत्तसंस्था)भेदभावाचा हेतू नाही?राजस्थानच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक आणि मासिकाचे मुख्य संपादक नाथमल डिडेल यांनी मासिकातील चूक मान्य केली आहे. डिडेल यांनी म्हटले की, महिलांसाठी व्यायाम म्हणून घरकामाची शिफारस करायला नको पाहिजे होती. तथापि, आपल्या समाजात परंपरेने हे घडत आले आहे. संबंधित लेखकावर त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. त्यामागे कोणताही भेदभावकारक हेतू नाही, याची ग्वाही मी देतो.ही तर लाजिरवाणी बाब‘शिविरा’ मासिकातील ही टिप्पणी महिलांबाबत भेदभाव करणारी असल्याची टीका यावरून सुरू झाली आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी या संस्थेच्या राष्टÑीय सचिव कविता श्रीवास्तव यांनी सांगितले की, ज्यापासून महिलांना मुक्त करणे अपेक्षित आहे, त्याच बंधनात राजस्थानचे शिक्षण खाते महिलांना अडकवू पाहात आहे, ही बाब लाजिरवाणी आहे.

टॅग्स :Womenमहिला