शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात सरकार कुणाचे ठरवताहेत महिला! १९७१ पासून आजवर महिला मतदारांच्या संख्येत २३५.७३ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 10:56 IST

लोकसभा, विधानसभा किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसतात, हे सुखद चित्र आहे. त्यामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत होत आहे. 

नवी दिल्ली : केंद्रामध्ये किंवा राज्यांमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणावे याबाबत महिलांनी केेलेले मतदान अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले होते. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती. भारताच्या लोकसंख्येत निम्मे प्रमाण महिलांचे आहे. १९७१पासून आजतागायत महिला मतदारांच्या संख्येत २३५.७२ टक्के इतकी वाढ झाली आहे.लोकसभा, विधानसभा किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसतात, हे सुखद चित्र आहे. त्यामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत होत आहे. 

१९६२ : प्रथमच स्वतंत्र आकडे१९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच पुरुष व महिलांच्या मतदानाची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी पुरुषांनी ६३.३१ टक्के, तर महिलांनी ४६.६३ टक्के मतदान केले होते. या निवडणुकांच्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकांत महिलांनी केलेल्या मतदानात सुमारे २० टक्के तर पुरुषांनी केलेल्या मतदानात फक्त तीन टक्के वाढ झाली होती.

विधानसभेतही महिला मतदारांचा वरचष्मा- विधानसभा निवडणुकांत महिलांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत पुरुषांनी ५९.३४% व महिलांनी ६२.२०% मतदान केले होते. - मागील वर्षात उत्तराखंड, मणिपूर, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांत महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केले. - गुजरात विधानसभेत निवडणुकांत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी होते. 

लोकसभा निवडणुकांतील मतदार

निवडणुक    वर्ष    पुरुष    महिला    फरक१३ वी लोकसभा    १९९९    ६३.९७%    ५५.६४%    ८.३३%१४ वी लोकसभा    २००४    ६१.६६%    ५३.३०%    ८.३६%१५ वी लोकसभा    २००९    ६०.२४%    ५५.८२%    ४.४२%१६वी लोकसभा    २०१४    ६७.०९%    ६५.३०%    १.७९%१७वी लोकसभा    २०१९    ६७.०२%    ६७.१८%    ०.१६%

टॅग्स :Votingमतदान