शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'जिथे महिला सुरक्षित नाहीत, तो समाज कलंकित...', कोलकाता प्रकरणावर उपराष्ट्रपतींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:35 IST

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोतकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशात संतापाची लाट आहे. बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यानंतर आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे. 

दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, "ज्या समाजात महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही, तो समाज सुसंस्कृत नाही. आपली लोकशाही कलंकित झाली, हाच आपल्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. महिलांच्या मनात या प्रकारची भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. आता खुप झाले, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स असायला हवे," अशी प्रतिक्रिया जगदीप धनखड यांनी दिली. 

राष्ट्रपती मुर्मू काय म्हणाल्या.?यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनीही कोलकाता घटनेवर संताप व्यक्त केला होता.  "बसं आता खूप झालं...कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला 'प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची' आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते. त्या प्रकरणानंतर 12 वर्षात असंख्य बलात्कार झाले, ज्यांना समाज विसरला आहे. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या संकटाचा आपण सर्वसमावेशकपणे सामना केला पाहिजे. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार कुठेतरी लपून बसले आहेत," अशी प्रतिक्रिया मुर्मू यांनी दिली.

काय आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण?कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते, शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, अंगातून रक्त येत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकार