शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 21:06 IST

Gujarat Crime News: पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे.

पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. आपल्या घरातच चोरी केल्यानंतर या महिलेने आपल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून घरात घुसलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी तपास करत काही तासांतच या महिलेचा बनाव उघडकीस आणून तिला अटक केली.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका महिलेला ओलीस ठेवून घरात चोरी करण्यात आल्याचा फोन गांधीग्राम पोलिसांना आला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सदर महिलेने सांगितले की, चेहरा लपवलेले तीन चोर घरात घुसले. त्यातील एकाने माझा हात पकडला आणि गळ्यावर चाकू ठेवून धमकी दिली. त्यानंतर दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये रोख आणि दागिने चोरले. घरामधून एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज  चोरीस गेला, असा दावा या महिलेने केला होता.

मात्र पोलिसांनी कसून तपास केला असता घरामध्ये बाहेरून कुठलीही व्यक्ती आल्याचा पुरावा सापडला नाही. तसेच महिलेने दिलेला जबाबही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यानंतर या महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

माझ्या पतीला पगार कमी असल्याने घरखर्च चालवण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे मी दिराच्या खोलीतून पैसे चोरले आणि दागिने लपवले, अशी कबुली या महिलेने दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली. महिलेने केलेल्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबासह परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकGujaratगुजरात