शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

स्त्रीदेह सर्वस्वी तिचाच, परस्पर्श हा अत्याचार! गर्दीत लगट करणा-या तरुणास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:50 IST

स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. त्यामुळे संमतीविना कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही

नवी दिल्ली : स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. त्यामुळे संमतीविना कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत, येथील न्यायालयाने एका ९ वर्षांच्या मुलीशी गर्दीचा गैरफायदा घेत, लगट करणा-या तरुणास ५ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.स्त्री कितीही वयाची असली, तरी तिच्या देहाला तिच्या मनाविरुद्ध अन्य कोणी स्पर्श करणे हादेखील लैंगिक अत्याचार आहे, असा निष्कर्ष नोंदवत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी छवी राम या आरोपीला तुरुंगात धाडले. आरोपी छवीराम हा लैंगिक विकृती असलेला असल्याने तो दया दाखविण्यास पात्र नाही, असेही न्यायालयाने म्हटले व तुरुंगवासाखेरीज त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. यापैकी ५ हजार रुपये पीडित मुलीला द्यावेत. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला भरपाई म्हणून ५० हजार रुपये द्यावे, असे निर्देशही न्यायाधीशांनी दिले.शिक्षा झालेला छवी राम हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ही पीडित मुलगी तिच्या आईसोबत दिल्लीच्या मुखर्जी नगरजवळील मार्केटमधून जात असताना छवीरामने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला होता. मुलीने हा प्रकार लगेच आईला सांगितल्यावर, आईने व इतर लोकांनी पळून जाणाºया छवीरामला पकडले होते.हरियाणा सरकार १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यासाठी दंड संहितेत दुरुस्ती करणार आहे. यासाठीचे विधेयक लवकरच आणले जाईल.विकृतांना मिळते ‘लैंगिक किक’न्यायालयाने म्हटलेकी, महिलांनाही खासगीपणाचा हक्क असतो हे विसरून जाऊन समाजात पुरुष आपली विकृत लैंगिक भूक भागविण्यासाठी स्त्रियांवर अनेक प्रकारे अत्याचार करताना दिसतात.जणू या विकृतांनाअशा दुष्कृत्यांनी‘लैंगिक किक’ चढते! गर्दीच्या मार्केटमध्ये,बस व मेट्रोसारख्या सार्वजनिकवाहनांमध्ये आणि चित्रपटगृहांसारख्या मनोरंजनाच्या ठिकाणी असे विकृत पुरुष वावरताना आढळतात.भारतासारख्याखुल्या, वेगाने प्रगती करीत असलेल्या व तांत्रिकदृष्ट्या महिलांना अशा विकृतांच्या चाळ्यांना बळी पडावे लागावे हे दुर्दैवी आहे.

टॅग्स :Courtन्यायालय