शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:48 IST

Uttar Pradesh News: नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेली महिला सुमारे १० तास जीवन मरणाशी संघर्ष केल्यानंतर ६०  किमी अंतरावर जिवंत सापडल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बलिया येथे घडली आहे.  

नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेली महिला सुमारे १० तास जीवन मरणाशी संघर्ष केल्यानंतर ६०  किमी अंतरावर जिवंत सापडल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बलिया येथे घडली आहे.  देवरिया जिल्ह्यातील शशी किरण देवी ही ५० वर्षीय महिला पाय घसरून शरयू नदीत वाहून गेली होती. नदीला पूर आलेला असल्याने ती पाण्याच्या प्रवाहासोबत दूर गेली. त्यानंतर सुमारे १० तास तिचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू होता. अखेरीस ६० किमी अंतरावर मनियर दियारा येथे स्थानिक लोक आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत या महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार देवरिया येथील मइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलिया दक्षिण येथील घनश्याम पांडेय यांची पत्नी शशी किरण देवी ही पहाटे ४ वाजता फिरायला गेली होती. यादरम्यान, नदीत पाय धूत असताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत नदीत वाहून गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिच्याबाबत काहीच माहिती मिळू शकल नाही.

दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनियर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुयारा येथे म्हैश चरायला घेऊन गेलेल्या वीरेंद्र प्रतापची पत्नी निर्मला देवी हिने नदीमधून वाहत जात असलेल्या महिलेला मदतीसाठी हात हलवताना पाहिले. त्यानंतर निर्मला देवी हिने आरडा ओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर लोकांनी पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या महिलेला सुखरूपपणे वाचवले. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

या भागामध्ये सरयू नदीला घाघरा या नावाने ओळखले जाते. नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी शशी  किरण देवी या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. अखेरीस संध्याकाळी या महिलेचे नातेवाईक आल्यानंतर तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.  

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेUttar Pradeshउत्तर प्रदेश