शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शबरीमाला मंदिरात महिला; अफवेने परिसरात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 04:37 IST

एक तरुण महिला आयप्पा मंदिराकडे निघाली असल्याचे वृत्त शबरीमाला परिसरात शनिवारी सकाळी पसरले आणि त्यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला.

केरळ : एक तरुण महिला आयप्पा मंदिराकडे निघाली असल्याचे वृत्त शबरीमाला परिसरात शनिवारी सकाळी पसरले आणि त्यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर भाविकांना प्रचंड गर्दी केली. त्या भागात जमावबंदी असूनही ती गर्दी वाढतच होती; पण ती महिला ५0 वर्षांवरील असल्याचे स्पष्ट होताच तणाव संपुष्टात आला.तामिळनाडूतील एक महिला आपल्या कुटुंबीयांसह आयप्पा मंदिराकडे निघाली होती. तिला पाहून वयाचा अंदाज न आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात १0 ते ५0 वर्षे वयाच्या मुली व महिलांना जाण्यास बंदी आहे. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवून मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत.या मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडल्यापासून तिथे रोज तणाव निर्माण होत आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरविले आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच मंदिर व्यवस्थापन यांनी मंदिरात वरील वयोगटातील महिलांना प्रवेश मिळू नये, अशी भूमिका घेतली आहे. मंदिर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून संपूर्ण परिसरात दीड हजारांहून अधिक पोलीस उभे आहेत. (वृत्तसंस्था)> दाखवला जन्मदाखलाया महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना भाविक निदर्शकांनी अडवले. त्यावर तिने आपले वय सांगितले आणि आपल्या जन्माचा दाखलाही त्यांच्यासमोर ठेवला. त्यातून तिचे वय ५0 हून अधिक असल्याचे लक्षात येताच, भाविकांनी तिला मंदिराकडे जाण्यास संमती दिली. शुक्रवारीही दोन तरुण महिला पोलीस संरक्षणात मंदिरापर्यंत गेल्या होत्या; पण मुख्य पुजाऱ्याने त्या आल्यास आपण मंदिराची दारे बंद करून निघून जाऊ , असा इशारा दिल्याने त्या माघारी परतल्या.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिर