शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नवरा, 2 मुलांना सोडून प्रियकरासह परदेशात पळून गेली; सीमा-अंजूनंतर आता दीपिकाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 10:56 IST

दीपिका आपल्या मुलांना सोडून प्रियकरासह परदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दीपिकाच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सीमा हैदर आणि अंजू यांच्यानंतर आता राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील दीपिकाचे नाव चर्चेत आहे. दीपिका आपल्या मुलांना सोडून प्रियकरासह परदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दीपिकाच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तपास सुरू आहे, मात्र अद्याप दीपिकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. 

डुंगरपूर जिल्ह्यातील भैमई गावाती ही घटना घडली आहे. 10 जुलै रोजी एक महिला घरातून न सांगता दुसऱ्या समाजातील तरुणासोबत परदेशात गेली. महिलेला दोन मुलं आहेत. एक मुलगी 11 वर्षांची आहे तर मुलगा 7 वर्षांचा आहे. पत्नी घरातून अचानक बेपत्ता झाल्यानंतर पतीने चितरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र आजपर्यंत तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संतप्त लोकांनी एसपी कार्यालयाला घेराव घातला.

महिला दोन मुलांसह गावात राहत होती तर तिचा नवरा मुंबईत कामाला होता. पतीच्या अनुपस्थितीत महिला अनेकदा गुजरात आणि उदयपूर येथे उपचारासाठी जात होती. 10 जुलै रोजीही ती आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी गुजरातला गेली होती, मात्र 13 जुलैपर्यंत ती परतली नाही.

पत्नीने पतीला व्हॉट्सएपवर कॉल करून सांगितले, "तू माझ्यामुळे दु:खी राहायचास म्हणून मी तुझ्यापासून दूर आले आहे..." हे ऐकून नवऱ्याला धक्काच बसला. मुंबईहून घाईघाईने घरी आल्यावर पत्नी बेपत्ता असल्याचे दिसले. घराची तपासणी केली असता लाखोंचे दागिने आणि रोकडही गायब होती. त्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ज्यांची चौकशी अद्याप सुरू आहे.

या प्रकरणी चितरी पोलीस स्टेशनचे अधिकारी गोविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुकेश पाटीदार यांनी रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, त्याची पत्नी दीपिका हिने 7 जुलै 2023 रोजी घरून उपचाराच्या नावाखाली गुजरातला जात असल्याचं सांगितलं आहे. तेथून पत्नी बेपत्ता झाली. आम्ही तपास करत आहोत."

दरम्यान, महिलेचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती एका तरुणासोबत बुरखा परिधान केलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती साडीत दिसत आहे. या घटनेबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. महिला कुवेतला गेल्याची चर्चाही आता समोर येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.