शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये महिलेची हत्या; चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 09:26 IST

गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चोटी गँग असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर  हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत,

रांची, दि. 22- गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. पण हा प्रकार नेमका कोण करतो हे अजूनही समोर आलेलं नाही. पण झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चोटी गँग असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर  हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

साहिबगंजमध्ये जमावाने चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतलं होतं,त्यात एका महिलेचाही समावेश होता. या सर्वावर चोटी गँगच्या कृत्यात सामील असल्याचं समजून हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आलं होतं. पण हल्ल्यात एक महिला जबर जखमी झाली होती. त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यावेळी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, असं पोलिस अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता पण तोपर्यंत या चौघांना गंभीरपणे मारहाण झालेली होती. साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापण्याचा एकही प्रकार घडलेला नसताना हा हल्ला करण्यात आला. वेणी कापण्याच्या फक्त अफवा आहेत असंही, पोलिस अधीक्षक पी. मुरुगन म्हणाले आहेत. चोटी गँगमध्ये असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणावर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दास यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मारल्या गेलेल्या महिलेच्या १४ वर्षीय मुलाची सरकार काळजी घेईल, असं दास यांनी सांगितलं. पूर्व सिंगभूम जिल्ह्यात वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांनी सरपंच व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या बाबत सविस्तर माहिती देत या घटना खोट्या असल्याचं सांगितलं आहे.