शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! पतीची हत्या करुन 'ती' मृतदेहासोबत 2 दिवस झोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 08:11 IST

दारू पिऊन अतिशय घाणेरड्या शिव्या देणा-या व मारहाण करणा-या पतीला कंटाळलेल्या एका महिलेनं त्याची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवी दिल्ली, दि. 28 - दारू पिऊन अतिशय घाणेरड्या शिव्या देणा-या व मारहाण करणा-या पतीला कंटाळलेल्या एका महिलेनं त्याची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या मृतदेहाचा बंदोबस्त करता न आल्याने दोन दिवस ही महिला चक्क पतीच्या मृतदेहाशेजारीच झोपली. ही घटना दिल्लीतील कापसहेडा परिसरातील आहे.  दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला युक्ती सुचली.

यानुसार तिस-या दिवशी सकाळी तिनं लोकांना असे सांगितले की, पतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. लोकांनाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व मृतदेह घेऊन ते स्मशानभूमीत पोहोचले. आरोपी महिलेचं नाव शिल्पी अधिकारी (वय 32 वर्ष )असे असून पती नितीशची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

कसा उघड झाला गुन्हा?दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली व मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वी पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. पोलिसांनी संशय आल्यानं त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेला. पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे घडल्या प्रकाराचे सत्य सर्वांसमोर आले. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आरोपी पत्नी शिल्पीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शिल्पीनं सांगितले की, नितीश दारू पिऊन मारहाण करायचा, सोबत शिवीगाळदेखील करायचा. त्याच्या या छळामुळे शिल्पी कंटाळली होती. या सर्व त्रासातून तिला मुक्तता हवी होती. याच कारणामुळे तिनं नितीशची गळा दाबून हत्या केली. शिल्पी मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी होती. शिल्पी व नितीशची दोन मुलं आहे. दोघंही मुलं शिल्पीच्या आईवडिलांजवळ राहतात. तर नवी दिल्लीत शिल्पी व नितीश राहत होते.