शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

या महिलेने शोधला होता वीरप्पनचा ठावठिकाणा, मोहीम फत्ते झाल्यावर गेली विस्मरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:36 IST

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता.

कोईंबतूर - कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता. मात्र तीन राज्यांमधील पोलिसांना अनेक वर्षे चकमा देणाऱ्या वीरप्पनचा शोध घेण्यात शानमुगा प्रिया या महिलेने आपल्या जिवाची बाजी लावून  मदत केली होती.  मात्र वीरप्पनचा खात्मा झाल्यानंतर पोलिसांचा गौरव झाला, पण या महिलेला मात्र सगळेच विसरून गेले. वडावली येथे राहणारी शानमुगा प्रिया ही महिला आपल्या घाडसाची कहाणी आपल्या दहा वर्षांच्या मुलीला रोज सांगत असते. "जेव्हा वीरप्पनच्या आसपास जाण्यासही सर्वजण घाबरत तेव्हा मी त्याच्या पत्नीसोबत मैत्री केली आणि वीरप्पनची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वीरप्पनला घेरून त्याला ठार मारले." असे प्रिया सांगते.   ऑपरेशन नॉर्दन स्टार अंतर्गत प्रिया वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मीसह त्याच्या घरात चार महिने राहिली होती. तेथून ती सगळी माहिती पोलिसांना पुरवत होती. त्यावेळी सगळे ठरल्या प्रमाणे झाले नाही. मात्र वीरप्पनची धुसर होत असलेली नजर आणि त्याचा जंगलातील ठावठिकाणा यांची माहिती पोलिसांना दिली, असे प्रिया सांगते. या कामगिरीसाठी बक्षीस देण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते. मात्र बक्षीस दूरच आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असेही ति सांगते. यासंदर्भात प्रिया हिने सरकार दरबारीसुद्धा पाठपुरावा केला. मात्र तिला अद्याप यश आलेले नाही. दुसरीकडे केवळ वीरप्पन विरोधातील शेवटच्या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचाच सन्मान करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू