शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या बॅगेत सापडले वापरण्यात आलेले कंडोम, महिलेने केली बलात्काराची तक्रार; न्यायालयाकडून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:42 IST

दिल्लीच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून एका व्यक्तीची सुटका केली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाची किंवा लक्षवेधक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीच्या आईला आपल्या मुलीच्या हॅण्डबॅगमध्ये तीन वापरण्यात आलेले कंडोम सापडले होते. ज्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता.

ठळक मुद्देदिल्लीच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून एका व्यक्तीची सुटका केलीमुलीच्या हॅण्डबॅगमध्ये वापरण्यात आलेले कंडोम सापडल्यानंतर महिलेने केली होती तक्रारतरुणीने सहमतीने शरिरसंबंध ठेवल्याचं समोर आल्यानंतर न्यायालायने केली सुटका

नवी दिल्ली - दिल्लीच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून एका व्यक्तीची सुटका केली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाची किंवा लक्षवेधक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीच्या आईला आपल्या मुलीच्या हॅण्डबॅगमध्ये तीन वापरण्यात आलेले कंडोम सापडले होते. ज्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता. पण न्यायालयात सुनावणीदरम्यान, तरुणीने त्याच्यासोबत सहमतीने शरिरसंबंध ठेवल्याचं समोर आलं. यानंतर न्यायालयाने आरोप करण्यात आलेल्या तरुणाची निर्दोष सुटका केली. 

शरिरसंबंधानंतर तरुणीने संधी मिळाल्यावर योग्य ठिकाणी फेकून देण्यात येईल या उद्देशाने कंडोम आपल्या बॅगेत ठेवले होते असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, आरोपीने लग्न करण्याचं खोटं आश्वासन देत 20 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या लक्षात आलं की, आई-वडिलांना  आपल्या शारिरीक संबंधांची माहिती मिळाल्याने घाबरलेल्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये लग्नाचं आश्वासन दिला गेल्याचा काही संबंध नसल्याचंही समोर आलं. 

हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, तरुणीने एका हॉटेलमध्ये तरुणासोबत शारिरीक संबंध ठेवले. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या बॅगेत तीन कंडोम असल्याचं तिच्या आईला आढळलं. यानंतर तरुणीने संपुर्ण कहाणी आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने तात्काळ 100 नंबरला फोन करुन तक्रार केली. 

न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं की, 'जर तरुणीच्या आईला बॅगेत कंडोम सापडलेच नसते तर कदाचित गुन्हा दाखल झालाच नसता. महिलेने आपण आरोपीच्या आई-वडिलांना याआधी भेटलो असून त्यावेळी लग्नाची कोणतीही बोलणी झाली नसल्याचं कबूल केलं आहे. तरुणीनेही आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही माहित नसल्याचं सांगितलं आहे. आपल्यात लग्नाची कोणतीही बोलणी झाली नसल्याची कबूली तरुणीने देणे, पोलीस तक्रारीमधील दावा फेटाळून लावत आहे'.

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालय