सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला रस्त्यावर फोनवर बोलत जात आहे. तिने एका बाळाला देखील उचलून घेतलं आहे. याच दरम्यान अचानक तिचा पाय एका उघड्या मॅनहोलमध्ये जातो आणि ती मुलासह आतमध्ये पडते.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला तिच्या मुलासह उघड्या मॅनहोलमध्ये पडताना दिसत आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. महिला फोनवर बोलण्यात इतकी व्यस्त आहे की उघड्या मॅनहोलकडे तिचं लक्षच जात नाही.
महिला मॅनहोलमध्ये पडल्यानंतर रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी लगेचच धाव घेत महिलेला मदत केली. तिला आणि बाळाला मॅनहोलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यामध्ये सुदैवाने, कोणीही जखमी झालेलं नाही आणि स्थानिकांनी तिला ताबडतोब वाचवलं. फरीदाबाद ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे आणि याला निष्काळजीपणाचे परिणाम म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की, महिला तिच्या लहान मुलाला हातात घेऊन फोनवर बोलत होती. तिच्या हलगर्जीपणाचे परिणाम बाळाला भोगावे लागू शकतात.