शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रसंग करणा-याला तिने जीभ तोडून घडवली अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 19:03 IST

केरळमध्ये एका महिलेनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी तिच्यावर अतिप्रसंग करणा-याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

तिरुवनंतपुरम, दि. 2 - केरळमध्ये एका महिलेनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी तिच्यावर अतिप्रसंग करणा-याला चांगलीच अद्दल घडवली आहे. कोचीमध्ये सोमवारी रात्री एका महिलेवर शेजारील व्यक्तीनं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं महिलेचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेनं स्वतःच्या बचावाखातर चक्क त्या व्यक्तीची जीभच तोडून टाकली. महिलेनं या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तिने 30 वर्षीय शेजा-याची कापलेली 2 सेंटीमीटरची जीभही पोलिसांच्या हवाली केली.पोलिसांनी त्या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 447, 354, 367 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीसुद्धा त्याला लैंगिक छळाच्या आरोपाखाली एक आठवड्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेस आमदाराने एका 51 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकारानंतर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आमदार एम विन्सेट याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आमदाराविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती.याबाबत अधिक माहिती अशी,  तिरुवअनंतपूरममधील बलरामपूरम येथे राहणाऱ्या 51 वर्षीय गृहिणीने बुधवारी ( 19 रोजी ) झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच महिलेच्या पतीने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात आमदार एम विन्सेटने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. गेले काही दिवस विन्सेट आपला पाठलाग करत होता. त्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ चालवला होता. तसेच त्याने दोन वेळा सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते, हे सर्व आरोप आमदाराने फेटाळले आहेत.