रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार

By Admin | Updated: June 8, 2016 09:34 IST2016-06-08T09:34:10+5:302016-06-08T09:34:10+5:30

नैराश्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २२ वर्षीय महिलेवर रुग्णालयातील दोन पुरुष कर्मचा-यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Woman and Wardaboy raped women in hospital | रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार

रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार

ऑनलाइन लोकमत 

मेवाट, दि. ८ - नैराश्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २२ वर्षीय महिलेवर रुग्णालयातील दोन पुरुष कर्मचा-यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील मेवाट जिल्ह्यातील एसएचकेएम रुग्णालयात सोमवारी रात्री ही घटना घडली. 
 
पिडित महिलेला जबरदस्तीने रिकाम्या खोलीत नेण्यात आले तिथे ती महिला मदतीसाठी आरडाओरडा करणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. वॉर्ड बॉय आणि सुरक्षारक्षक दोघांनी मिळून बलात्कार केला. दोघे  फरार असल्यामुळे अद्याप अटक झालेली नाही.  
 
रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्ड नंबर १७ मध्ये ही महिला दाखल होती. रात्री साडेअकराच्या सुमारास वॉर्डबॉयने तिला बाहेर बोलवले. बाहेर आल्यानंतर महिला तिचे नातेवाईक थांबलेल्या प्रतिक्षालयाच्या दिशेने जात असताना वॉर्ड बॉयने तिला मागून पकडले व जबरदस्तीने रिकाम्या खोलीत नेले. 
 
खोलीच्या शेजारी तैनात असलेला सुरक्षारक्षकही तिथे आले व दोघांनी सामूहिक बलात्कार केला. महिलेचे नातेवाईक तिला शोधत आले तेव्हा ती रुमबाहेर पडलेली होती. पोलिसांना रात्री एकच्या सुमारास रुग्णालयाने घटनेची माहिती दिली. तीन मुलांची आई असणा-या या महिलेला दोन जूनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस वॉचमन आणि सुरक्षारक्षकाचा शोध घेत आहेत. 
 
 

Web Title: Woman and Wardaboy raped women in hospital