शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, नग्न करून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:12 PM

झारखंडमध्ये एका 50 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली मारहाण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देझारखंडमध्ये एका 50 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली मारहाण करण्यात आली आहे.मारहाणीवरच न थांबता त्या महिलेला नग्न करून तिची गावातून धिंड काढण्यात आली.दुमका जिल्ह्यातील मुख्यालयापासून जवळपास 57 किलोमीटरवरच्या तलझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

रांची- झारखंडमध्ये एका 50 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीवरच न थांबता त्या महिलेला नग्न करून तिची गावातून धिंड काढण्यात आली. दुमका जिल्ह्यातील मुख्यालयापासून जवळपास 57 किलोमीटरवरच्या तलझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महेश लिट्टी गावातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात मृतांच्या कुटुंबीयांनी मृतकाच्या भावाची पत्नी, सून आणि मुलीवर चेटकिणीचा आरोप लावत त्यांना मारहाण केली आणि तिघींना बंदी बनवलं. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्नांनी त्या तिघींना जमावाच्या तावडीतून सोडवलं. तिघींनाही उपचारासाठी आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात पोलिसांनी सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक डीएसपी संतोष कुमार म्हणाले, महेश लिट्टी गावात वास्तव्याला असणाऱ्या 50 वर्षीय सोनालाल किस्कू रविवारी सकाळी राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. रॅलीहून परतणाऱ्या काही लोकांना ते बसच्या सीटवर मृतावस्थेत सापडले. सोनालालचा मुलगा किस्कू व त्याच्या इतर नातेवाईकांनी त्यांचा जादूटोण्यानं मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढत गाववाल्यांना भडकावले. सोनालालच्या मृत्यूचा आरोप त्याच्या मोठ्या भावाच्या 50 वर्षाच्या पत्नीवर लावण्यात आला.सोनालालचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सांगितलं की, सोनालालच्या भावाची बायको एक चेटकीण असून, ती जादूटोणा करते. त्यानंतर सर्व ग्रामस्थ सोनालालच्या भावाच्या घरी पोहोचले, सोनालालच्या चुलत भावाची बायको, सून आणि मुलीला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. तसेच सोनालालच्या भावाच्या पत्नाला निर्वस्त्र करून तिची गावातून धिंड काढली. आरोपींचं अजूनही मन न भरल्यानं त्यांनी तिघींनाही एका खोलीत बंद करून रूमला टाळं लावलं. त्यानंतर पोलिसांना ही घटना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघींनाही जमावाच्या तावडीतून सोडवलं. कलम 2001अंतर्गत सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील.  

टॅग्स :Molestationविनयभंग