बिहारमधील मोतिहारी येथून प्रेमप्रकरणाचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. तीन मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आता महिलेने पोलिसांसमोर दावा केला आहे की, ही तीन मुलं तिच्या पतीची नसून तिच्या प्रियकराची आहेत. हे संपूर्ण प्रकरण हरसिद्धी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. होळीच्या दिवशी महिला नात्याने तिचा पुतण्या लागणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. यानंतर पतीने हरिसिद्धी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुतण्यासोबत फरार झालेल्या ३० वर्षीय महिलेने सोमवारी हरसिद्धी पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन करून सांगितलं की, ही तीन मुलं तिच्या पतीची नसून तिच्या प्रियकराची आहेत आणि ती मुलं परत करणार नाही. या प्रेमप्रकरणामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. संपूर्ण गावात याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
दाथी गावातील रहिवासी चुनमुन राम याचं २२ एप्रिल २०१४ रोजी मनीषा कुमारी हिच्याशी लग्न झालं होतं. चुनमुन रामने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं २०१७ मध्ये निधन झालं. त्यानंतर तो बंगळुरूला मजूर म्हणून काम करण्यासाठी गेला. तेव्हापासून बहुतेक वेळ तो पैसे कमवण्यासाठी बाहेर असायचा. याच दरम्यान, तो घरी येत-जात असायचा.
चुनमुन म्हणाला की, जेव्हा पत्नीचे पुतण्या आकाश कुमारशी असलेले संबंध पाहिले तेव्हा त्याला सुरुवातीला काहीही संशय आला नाही. एकदा ऑगस्ट २०२४ मध्ये तो घरी आला तेव्हा त्याने त्याचा पुतण्या आणि पत्नी दोघांनाही एकत्र पाहिलं. यानंतर त्याने त्याची पत्नी मनीषा हिला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवल आणि तो बंगळुरूला गेला. यावेळी जेव्हा तो होळीसाठी घरी आला तेव्हा त्याला कळालं की त्याची पत्नी मनीषा तिच्या तीन मुलांसह तिचा प्रियकर आकाश कुमारसोबत तिच्या आईवडिलांच्या घरातून पळून गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.