शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जेडीयूतून शरद यादवांची होऊ शकते हकालपट्टी, पक्ष कारवाईच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:47 IST

जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, दि. 10 - जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. गुजरात राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदारानं भाजपा उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. गुजरातमधील जेडीयूचा आमदार हा शरद यादव समर्थक आहे. तसेच शरद यादवही सार्वजनिकरीत्या मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या धोरणांवर टीका करत आहेत. याविरोधात ते आजपासून 12 ऑगस्टपर्यंत बिहारच्या सात जिल्ह्यांमध्ये जनसंवाद मोहीम उघडणार आहेत. तसेच 17 ऑगस्टला शरद यादव यांनी समान विचारधारा असलेल्या पक्षांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपासून स्वतःला लांब ठेवत भविष्यातील राजकीय वाटचालीचा सूचक इशारा दिला आहे. दुसरीकडे पक्षाचा व्हिप झुगारून वसावातील आमदारानं काँग्रेसला मतदान केलं होतं. त्यामुळेच अहमद पटेलांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झालीय. नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयावर शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचा दौरा करत आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं शरद यादव यांनी सांगितलं आहे. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला होता'. शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरू केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जानकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करू शकतात.