शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:04 IST

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.

लखनऊ : भारत जगाला समृद्धी मिळवून देणार आहे. भारत समृद्ध झाला, तर जगाचीही प्रगती होईल. उत्तर प्रदेश हे परकीय गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय समाजातील लोकांच्या आकांक्षा आता सरकारला वेगाने काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यामुळे विकासाच्या कामांनाही गती आली आहे. 

बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा फार विकास न झाल्याने, त्यांना पूर्वी ‘बिमारू’ राज्ये म्हटले जात असे. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एके काळी बिमारू अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशने आता लोकांच्या मनात आशा निर्माण केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत उत्तर प्रदेशने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हे राज्य उत्तम कारभार, सुधारलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासाठी ओळखले जाते. त्यामुळे उद्योजकांना या राज्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एन.चंद्रशेखरन यांचीही या  परिषदेत भाषणे झाली.

रिलायन्सची गुंतवणूक  ७५ हजार कोटींची उत्तर प्रदेशमध्ये ५-जी मोबाइल सेवा, रिटेल नेटवर्क, अक्षय ऊर्जा या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या चार वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा या उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेशात अतिरिक्त एक लाख रोजगार उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय