शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 08:36 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरकारकडून पुन्हा निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे, तर अनेक राज्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, हरयाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत.

पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह आढळलेले नमुने पाठवण्यासही सरकारी आदेशात सांगण्यात आले आहे.कोरोना संसर्गामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉकड्रिल होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाचे प्रधान आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासमवेत आढावा बैठकीत तयारीची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सोमवारी झज्जर येथील एम्सला भेट देणार असून तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकांनी घाबरू नये, सतर्क राहावे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. अलीकडेच झालेल्या संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक उपकरणे आणि पुरवठा यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तयारीचा साप्ताहिक आढावाही घेतला जात आहे, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 32,814 वररविवारी गेल्या 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या 32,814 वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे गेल्या शनिवारपेक्षा कमी असली तरी. शनिवारी 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात प्रकरणे वेगाने वाढली आहेत.

दिल्लीत रविवारी चार जणांचा मृत्यूराजधानी दिल्लीत रविवारी चार जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून 699 नवीन रुग्ण आढळले आहेत. या वर्षातील एका दिवसात कोरोनामुळे झालेला हा सर्वाधिक मृत्यू आहे. 467 रुग्ण बरे झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रिय प्रकरणे 2,460 पर्यंत वाढली आहेत. त्यापैकी 126 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यात 53 आयसीयूमध्ये, 8 व्हेंटिलेटरवर आणि 33 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य